परिमळ--प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य

Post Reply
User avatar
admin
Site Admin
Posts: 21569
Joined: Wed Nov 16, 2011 9:23 am
Contact:

परिमळ--प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य

Post by admin » Sat Jan 21, 2017 6:08 am

Book Review - पुस्तक परिचय

मनातल्या भावविश्वाचा शोध आणि बोध घेणारा कवितासंग्रह

परिमळ
Image
भावविश्वातून शब्दरूप होऊन साकारणा-या कवितांचा पहिला कवितासंग्रह ‘शब्दकळा’ आणि त्यापाठोपाठ आपल्या कवितांचा सुगंध आसमंतात पसरवणारा दुसरा कवितासंग्रह ‘परिमळ’ हा सौ. मनिषा पिंटू वराळे यांची अंतरीची मनिषा पूर्णत्वाकडे नेणारा आहे.माणसाच्या मेंदूपेक्षा कविता लिहिणा-यांचे हृदय अधिक संवेदनशील असते हे कुणीही मान्य करावं असा हा कवितासंग्रह. कवयित्री सौ. मनिषा पिंटू वराळे ह्या नवकवी म्हणून जरी संबोधल्या गेल्या तरी त्यांच्या कविता खोल हृदयाचा ठाव घेणा-या आहेत. विश्वनिर्मात्यावर अतूट श्रद्धा, भक्ती आणि सदोदित स्मरणभाव कवितेत जागृत आहे.समाज, कुटुंब यातील विषमता, दुजाभाव, उपेक्षा आणि अंतरीच्या भावना त्यांच्या काव्यातून व्यक्त झाल्या आहेत. शब्द ग्रामीण असले तरी विचार - मन - प्रगटीकरण साधे सोपे असून कुठे तरी आपल्या जीवनाशी साधर्म्य दाखवणारे आहे.स्त्री जीवनाबद्दल कळवळ, आत्मीयता, तिच्या वेदना, उपेक्षा आणि सहनशीलतेचा कळस गाठूनही ही कशी सोशिक आणि पराक्रमी ठरते, धाडस आणि शौर्याची पुतळी होते, स्त्री जन्म हा कसा अनेक पैलूंनी सजलेला आहे, घर - दार - शेजार - गांव - राष्ट्र इतकेच नव्हे तर सर्व जगाला दिपवून टाकण्याचे सामर्थ्य तिच्यात कसे आहे याचे दर्शन कवयित्री सौ. मनिषा पिंटू वराळे यांच्या कवितेतून झाल्याशिवाय राहत नाही.असे म्हणतात की, ‘कवी जन्मावा लागतो आणि कष्टावा ही लागतो.’ मानव मनाचे वाचन त्यास करता आले पाहिजे. आपला विचार शब्दबद्ध करता यावा, अनेक सिद्धहस्त कवींचे अवलोकन, अध्यन आणि त्यांच्या कवितांचा विनम्रतेने स्वीकार करता यावा असे नवोदित कवींच्याकडून अपेक्षित असते आणि कवयित्री सौ. मनिषा पिंटू वराळे ह्या त्यास पात्र आहेत.‘जे न देखे रवी ते देखे कवी’ ह्या उक्तीप्रमाणे खरा कवी जात, धर्म, पक्ष, दिशा, काल यांच्या पलीकडे क्षितिज कवेत घेणारा तर कधी सागराचा ठाव घेणारा, मन - हृदय यांना स्पर्शून प्रतिभाविलासात मग्न आढळतो.कवयित्री मनिषा वराळे आपल्या जन्मदात्यांच्या ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही. पदोपदी अनेक कवितांमधून आई वडिलांनी घेतलेले कष्ट - उपेक्षा आणि आपल्या मुला बाळांसाठी झीजवलेले जीवन यांचे वर्णन वाचतांना हृदय पिळवटून निघते, डोळे पाणावतात. कोमल ह्रदयाची मुलगीच आपल्या साठी सर्वस्व वेचणा-या आई बापाला कवटाळून राहू शकते याची प्रचीती ‘परिमळ’ या कवितासंग्रहातून येते.स्त्रीला मिळालेला जोडीदार हा तिच्या जीवनाला उभारी देतो आणि उजळ माथ्याने जगण्यास सहाय्यभूत ठरतो. त्याच्या सहकार्याने पुलकित झालेली कवयित्री त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबित होते.अनेक विषय हाताळतांना कवयित्री सौ. मनिषा यांचा हळुवारपणा, सहृदयता, सोशिकता, प्रांजळपणा पहावयास मिळतो. रसिक वाचकांनी हा कवितासंग्रह आपल्याजवळ बाळगावा, इतरांना दाखवावा असा आहे.०८ जानेवारी २०१७ रोजी नववर्षाचे औचित्य साधून कादंबरीकार स्वर्गीय देवदत्त पाटील सार्वजनिक वाचनालय, उमळवाड आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवशीय काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत कविवर्य डी. बी. चिपरगे, कविरत्न विजयकुमार बेळंके आणि सुप्रसिद्ध कवयित्री नीलमताई माणगावे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला. या निमित्ताने अनुभवसंपन्न, ख्यातकीर्त कवींच्या कवितांचे श्रावण भाग्य मिळाले. हे घडवून आणणा-या व नवकवींच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असलेल्या डॉ. सुनील दादा पाटील यांनी या ‘परिमळ’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनाने एक नवीन पाऊल उचलले त्या बद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. शेवटी असे म्हणावेसे वाटते ‘मनिषा दटे रहो...’ आपला उज्ज्वल भविष्यकाळच आपला उत्कर्ष ठरेल.प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य

ज्येष्ठ लेखक - समीक्षक - संपादक

संपर्क - ९७६६५८१३५३

· Title - Parimal (परिमळ)

· Poetess - Mrs. Manisha Pintu Varale (सौ. मनिषा पिंटू वराळे)

· Price - Rs. 70/-

· Published in India in 2017 by - Dr. Sunil Dada Patil

· On Behalf of KavitaSagar Publication, Jaysingpur

· 02322 - 225500, 09975873569, 08484986064

· sunildadapatil@gmail.com, kavitasagarpublication@gmail.com

--
डॉ. सुनील दादा पाटील (Ph. D.) संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर

Dr. Sunil Dada Patil (Ph. D.) 02322 - 225500, 09975873569
Image
Mail your articles to swargvibha@gmail.com or swargvibha@ymail.com

Post Reply