tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

अवघीदुनिया उत्सवात बघ शामिल आहे

 

 

अवघीदुनिया उत्सवात बघ शामिल आहे
तुला वेदने मीच एकटा बांधिल आहे...

 

काट्यांच्याही अंगावरती यावा काटा
दुःख फुलांचे इथल्या इतके कातिल आहे...

 

वरवर नारळ फुले वाहुनी हात जोडती
भक्ती कुठे ही काळजाच्या आतिल आहे...

 

आज पुन्हा ती वाट वाकडी करूण गेली
काय नेमका हेतू ह्याच्या मागिल आहे...

 

तू केंव्हाही कोठेही कर हल्ला मजवर
तुझियासाठी नेहमीच मी गाफिल आहे...

 

काल अचानक ज्या शस्त्राने जख्मी झालो
ओळखतो ते शस्त्र'तिच्या'ताफ्यातिल आहे...

 

जगनेसुद्धा सुवाच्य सुंदर जगलो आम्ही
मरणेही पुस्तकाप्रमाणे छापिल आहे...

 

कायफायदा लिहूनइतक्या गजलाबिजला
गजलेचा ना शेर एकही हासिल आहे...

 

 

iiii***किशोर मुगल***iiii

 

 

HTML Comment Box is loading comments...