tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

पहा ऐकलेही धुक्याने!

 

 

पहा ऐकलेही धुक्याने!
उठवले धुक्याला उन्हाने!!

 

नजर बोलली सर्व काही....
नजर ऐकते ते मुक्याने!

 

सदा झुळझुळे...गीत गाई....
शपथ घेतली ती झ-याने!

 

पुन्हा ओळखू एकमेकां....
पुन्हा आज भेटू नव्याने!

 

जसा लागला सूर्य तळपू....
दडी मारली काजव्याने!

 

पहा तोतये एक झाले....
विहरती कसे ते थव्याने!

 

जसा ठेवला पिंड माझा....
झडप घातली कावळ्याने!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...