tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

मी तिच्या वेणीतल्या गज-यात होतो!

 

 

मी तिच्या वेणीतल्या गज-यात होतो!
की, कुण्या गझलेतल्या मिस-यात होतो!!

 

मी तुझे निर्माल्य झालो, धन्य झालो!
वाटले दुनियेस, मी कच-यात होतो!!

 

ना उगा गझलेमधे आली झळाळी.....
मीच एकेका तिच्या मिस-यात होतो!

 

सोहळे माझेच अन् माझेच उत्सव......
मी दिवाळी, ईद अन् दस-यात होतो!

 

मी सुपामध्ये तसा जात्यामधेही;
भरडलेही मीच, मी भग-यात होतो!

 

बाज माझ्या लेखनाचा और होता!
मी रित्या जागेतही नख-यात होतो!!

 

पोत सौख्याचा ख-या, कळला कुणाला?
मी सुखाच्या भरजरी सद-यात होतो!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...