tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

हजार व्याधी'नी तो जर्जर

 

 

हजार व्याधी'नी तो जर्जर,
देश तरीही माझा सु'दर ||


जीवन म्हणजे रबरी चे'डू,
इकडुन ठोकर तिकडुन ठोकर ||


कुणी कुणाला इथे हसावे?
तूही जोकर मीही जोकर ||


फेसबुकातून डाफरतो का,
कधी जरासा ये रस्त्यावर ||


जीवन जगती लोक असे कि,
जीव म्हणाला,"थू: जगण्यावर ||


बोली होती खीरपुरीची,
समोर येते झुनका-भाकर ||


ज्याचे त्याचे प्रश्न अघोरी,
जगणे अवघे झाले दुष्कर ||


दु:ख म्हणाले,"चल शिखरावर!"
कोसळून तू मजला सावर ||


विझण्याआधी ज्योत कुडीची,
मार इश्वरा नाजूक फु'कर ||

 

 


-शिवाजी घुगे.

 

 

 

HTML Comment Box is loading comments...