tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

खळखळून हसलो नाही, मनमुराद रडलो नाही!

 

खळखळून हसलो नाही, मनमुराद रडलो नाही!
मी मनाप्रमाणे माझ्या केव्हाही जगलो नाही!!

 

का माझ्यावरती कोणी ना उडवावे शिंतोडे?
नखशिखांत बदनामीने मी अजून भिजलो नाही!

 

ना कळे अशा मी कुठल्या मातीचा बनलो होतो;
मी कुठेच रुळलो नाही, मी कुठेच रुजलो नाही!

 

दररोज दिले दुनियेने दु:खांचे नवीन भारे;
दुनियाही दमली नाही, अन् मीही झुकलो नाही!

 

स्वाक्षरी बरोबर होती, तारीख बरोबर होती;
मी धनादेश खात्रीचा अन् अजून वटलो नाही!

 

ऎकून दाद जनतेची मज गझल म्हणाली माझी....
मी हृदयावरून गेलो, हृदयाला भिडलो नाही!

 

हृदयात जरी स्वप्नांचे पेटते निखारे होते;
मी धुमसत धुमसत जगलो, दिलखुलास फुललो नाही!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

HTML Comment Box is loading comments...