tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

मन माझे ऐकत नाही!

 

 

 

मन माझे ऐकत नाही!
कळते पण वळतच नाही!!

 

वाटते तुला बोलावे.....
वेळेला स्मरतच नाही!

 

हरवते तुझ्यातच इतकी.....
मी मला सापडत नाही!

 

ओठांवर तुझीच वस्ती....
पण, तू तर भेटत नाही!

 

तू समोर असतो तेव्हा....
मी माझी असतच नाही!

 

प्राजक्त तूच रे माझा.....
माझ्यातच मावत नाही!

 

एकटी कशी राहू मी?
मज तुला सोडवत नाही!

 

सर्वस्व दिले मी तुजला....
मी मागे उरतच नाही!

 

मन तुझ्यात असते माझे.....
पण, तुलाच समजत नाही!

 

हो शब्द शब्द तू माझा.....
कविता मज सुचतच नाही!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...