tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh









पाज साकी पाज मजला होवू दे बेहोष यार

 

 

(होळी स्पेशल)

 

 

holi

 


पाज साकी पाज मजला होवू दे बेहोष यार,
शुद्ध आल्यावर करू या पापपुण्याचा विचार !!


जातपात - धर्म ह्यांचे भेद मिटती ह्या इथे,
हाच आहे तो ठिकाणा ज्या ठिकाणी ना विकार !!


पेश करतो पेग तुजला बघ नशेचा तू खुमार,
व्यर्थ त्याची जिंदगानी ह्यास देतो जो नकार !!


सोड चिंता तू जगाची झाक डोळे घोट मार,
चाखतो जो स्वाद ह्याचा तोच ठरतो रे हुशार !!


मार "खंबा " तू खुशीने मोजतो का पेग यार,
नाही जर का रोख आता राहू दे बाकी उधार !!


वाहतो का व्यर्थ ओझे धर्मशास्त्राचे भिकार,
तीर दारूच्या नशेचा होवू दे रे आरपार !!


ऐकूनी घे बात माझी हो मजेने बेकरार,
जिंदगीचा ना भरोसा जिंदगी आहे जुगार !!

 

 


— शिवाजी घुगे.

 

 

 

HTML Comment Box is loading comments...