tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

रोज पाहिजे तुला बहार जीवनामधे!

 

 

रोज पाहिजे तुला बहार जीवनामधे!
पाहिजे वसंतही तसाच काळजामधे!!

 

भेटलीस तू मला, सुमार तो दुपारचा;
ती नशा, तशी मजा, न आज चांदण्यामधे!

 

चेह-यामधे तुझ्या छटा तरी अशा किती?
पाहतो तुझी छबी हरेक चेह-यामधे!

 

पारिजात ढाळतो फुलेच आसवांपरी;
वाट पाहतो तुझी अजून अंगणामधे!

 

लाख शिंपल्यांमधे मिळेल मोतशिंपही;
जीव गुंतवू नये, हरेक शिंपल्यामधे!

 

हा नव्हे समुद्र, ही धरेवरील आसवे!
जी पुसायला नदी मिळेल सागरामधे!

 

कुंतलामधे मला जरी न माळलेस तू;
घुंगरू बनून मी वसेन पैजणामधे!

 

पावसावरी कुणी लिहील खण्डकाव्यही;
पावसातली मजा कळेल पावसामधे!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...