tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

संपली श्वासांतली सारी हवा

 

 

संपली श्वासांतली सारी हवा
बेअसर झाली बघा तुमची दवा...

 

'ती'च केवळ जाणते रे भेद हा
कोणता आजार मज झाला नवा...

 

ठेवली त्यांनी उपाशी वासरे
निर्मिण्या रबडी मलाई अन खवा...

 

मी कसा आणू अता माझ्या मुला
अंगणी कोठूण चिमण्यांचा थवा...

 

जेवढेही ओतशिलना रक्त तू
तेवढी मजबूत होइल वाहवा...

 

चेहरा माझा न मजला आठवे
आरसा कोणीतरी मज दाखवा...

 

 

iiii***किशोर मुगल***iiii

 

 

HTML Comment Box is loading comments...